औरंगाबाद: तब्बल 75 दिवस आदर्श आचारसंहिता लागू होती. यामुळे जिल्हा परिषदेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नाही. परिणामी विकास कामांना काहीशी खिळच बसली होती, आता रविवारपासून ही आचारसंहिता पूर्णपणे शिथिल झाली असल्याने जिल्हा परिषद प्रशासन व पदाधिकारी दुष्काळासह कोणत्या कामांना प्राधान्य देतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
विद्यमान दुष्काळी स्थिती पाहता पाणीपुरवठा, विहिर, अधिग्रहण, चारा छावण्यांना वेळच्या वेळी धनादेश अक्षयगी, ग्रामीण रोजगार हमींची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करणे, मातीनाला बंधार्यांची तसेच रोडरस्त्याची सार्वजनिक स्वरुपाची कामे सुरू करणे, पाऊस पडला तरी लगोलग जनावरांसाठी चारा उगवणार नाही. यासाठी चारा छावण्यातील व्यवस्थापनाकडेही अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. जसजसा पावसाळा जवळ येत आहे. तसतसे ग्रामीण भागातून पाणी टँकरची मागणी वाढतच आहे. त्याचा पुरवठा करणे अत्यावश्यक आहे. या सर्वच बाबी निकडीच्या आहेत. यापैकी जिल्हा परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी कोणत्या बाबीला प्राधान्यक्रम देते व ते किती गतीने करणार याकडे लक्ष लागून आहे.